-8.7 C
New York
Wednesday, January 28, 2026

Buy now

एसटी बस आणि डंपर यांच्यात अपघात…

मालवण : कुडाळ येथून मालवणच्या दिशेने दुपारी १२:३० वाजता सुटणारी कुडाळ मालवण एसटी बस आणि चौके वरून धामापूरच्या दिशेने जाणाऱ्या डंपर यांच्यात चौके नारायण वाडी या ठिकाणी मंगळवारी दुपारी समोरासमोर जोरदार धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात एसटी बसचा चालक व प्रवासी सुदैवाने बचावले मात्र एसटी बसच्या चालकाच्या बाजूने दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

मालवण डेपोची एसटी बस (M H -१४ BT -३०६३) मंगळवारी दुपारी कुडाळ वरून मालवणच्या दिशेला येत असताना चौके नारायण वाडी येथे एसटी बस आणि चौके वरून धमापुरच्या दिशेने जाणाऱ्या डंपर(MH-०७- AJ -२८१०) यांच्यामध्ये एसटी चालकाच्या बाजूने जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एसटी बसचा चालक किरकोळ जखमी होऊन सुदैवाने बचावला.बसमधील प्रवाशांनाही किरकोळ दुखापती झाल्या.. मात्र झालेल्या अपघातात एसटी बसचे मोठे नुकसान झाले. चालक वाहक आणि किरकोळ जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. बसचालक आणि वाहक यांनी अपघाताची खबर मालवण एसटी आगारात दिली असून एसटी प्रशासनाकडून पुढील कार्यवाही करण्याची प्रक्रिया चालू आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!