नरडवे मार्गावर साचले पाणी ; सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी
कणकवली : तालुक्यात मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जोरदार मुसळधार पाऊस कोसळला. अगदी ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. या अचानकपणे कोसळलेल्या पावसामुळे वातावरण थंडगार झाले होते. तर कणकवली नरडवे रस्त्यावर ड्रीम होम नजिक रस्त्याच्या एका लेनवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. काही ठिका बऱ्याच प्रमाणात झाडांची पडझड झाली होती