11.3 C
New York
Sunday, June 1, 2025

Buy now

महावितरण च्या कार्यकारी अभियंत्याने घेतली ५ हजारांची लाच ; प्रतिबंधक विभागाने पकडले

कुडाळ : सोलार पॅनलचे चेकलिस्टवर सही करण्यासाठी ५ हजार रुपये मागणी करणाऱ्या कुडाळ महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता विजय नरसिंग जाधव यांना लाजलुचपत प्रतिबंधक विभागाने ही रक्कम घेताना रंगेहात पकडले.

कुडाळ येथील तक्रारदार हे अल्पी पोलराईज्ड टेकसोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे सोलारचे काम करतात यांनी बसवलेल्या सोलार पॅनलचे चेकलिस्टवर सही करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता (वर्ग २) विजय जाधव यांनी ५ हजार रुपये मागितले होते. याबाबत ५ मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली. होती या तक्रारीची प्रतिबंध विभागाने पडताळणी केली असता सापळा रचण्यात आला आज (मंगळवारी) या सापळ्यामध्ये महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता विजय जाधव हे अडकले त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित अधिनियम २०१८) चे कलम ७ प्रमाणे कुडाळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक मनोज जिरगे यांच्यासह पोलीस हवालदार पालकर, पोलीस हवालदार रेवणकर, अजित खंडे यांनी केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!