23.5 C
New York
Wednesday, August 6, 2025

Buy now

मोटारसायकलला जेसीबीची धडक ; मोटरसायकलस्वार जागीच ठार

कणकवली: जेसीबी ने धडक दिल्याने मोटरसायकल स्वार रोहन येदरकर हा जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दि.१९ मे रोजी रात्री ११.४५ वा.च्या सुमारास कासार्डे जांभळगाव येथे घडली.

याबाबतची फिर्याद रोहित सुभाष येदरकर यांनी पोलिसात दिली आहे.

फिर्यादि रोहित येदरकर(रा. सोमलेवाडी ता.देवगड) व त्याचा भाऊ रोहन सुभाष येदरकर हे दोघे भाऊ मोटरसायकलने काल रात्री गुरूकृपा हॉटेल येथे जेवण्यास गेले होते. जेवण झाल्यावर रोहन पेट्रोल भरण्यासाठी मोटरसायकल घेऊन(एमएच ०७ ए-६५९६) पेट्रोल भरण्यासाठी गेला होता. त्यावेळी आरोपी गुरूनाथ सुभाष चव्हाण मुळ राहणार विजापूर इडी सध्या राहणार कणकवली शाळा नं.२ जवळ यांच्या जेसीबीची(एक्यू ८४५४) धडक मोटरसायकलला बसली. वर्मी मार लागल्याने रोहन सुभाष येदरकर हा जागीच ठार झाला. हॉटेलकडे थांबलेल्या रोहित येदरकरला मोटरसायकलला अपघात झाल्याचे समजल्याने तो पेट्रोल पंपाच्या दिशेने निघाला. अपघातस्थळी रोहन सुभाष येदरकर रस्त्यात पडलेला होता. तो जागीच गतप्राण झाला होता.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!