14.4 C
New York
Sunday, October 12, 2025

Buy now

वैभव नाईक परशुराम उपरकर बनण्याच्या मार्गावर

ग्रामपंचायत निवडणूक लढू शकत नाही अशी परशुराम उपरकरांची राजकीय अवस्था

आमदार निलेश राणे यांनी वैभव नाईकांना फटकारले ; उपरकरांवर केली खरमरीत टीका

सिंधुदुर्ग : माजी आमदार वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुसरे परशुराम उपरकर बनायच्या दिशेने वाटचाल करत आहेत. तोंडाच्या वाफा सोडून फक्त परशुराम उपरकर होऊ शकता, असे सांगत कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी माजी आमदार वैभव नाईक यांना फटकारले आहे.

पुढे त्यांनी केलेल्या पोस्ट मध्ये असे म्हटले आहे की, आपल्या अनेकांना माहित नसेल परशुराम उपरकर म्हणजे कोण, राणे साहेबांच्या सोबत राहून उद्धव ठाकरेंना टीप देणारे हे शिवसैनिक होते. त्यानंतर राणेसाहेबांनी शिवसेना सोडली त्या पोटनिवडणुकीमध्ये या उपरकरांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. उद्धव ठाकरेंनी उपरकरांना विधान परिषद दिली त्यानंतर हे महाशय मनसेत गेले. मनसेमध्ये गटबजी केली, राज साहेबांनी कार्यकारणी बरखास्त करून याची हकालपट्टी केली. हा ऊबाठात गेला आणि आज साधी ग्रामपंचायत निवडणूक लढू शकत नाही अशी राजकीय अवस्था परशुराम उपरकरची आहे. याचा एकच छंद राणे परिवारावर रोज उठून टीका करायची. आज बघायला गेलं तर रिकामटेकडे असलेले वैभव नाईक हे परशुराम उपरकर यांच्या पावलावर पाऊल ठेऊन वाटचाल करत आहेत. वैभव नाईक, काहीतरी नवीन निर्माण करा, स्वतःच्या खिशात हात घाला आणि सिंधुदुर्गासाठी काहीतरी निर्माण करा. तोंडाच्या वाफा सोडून तुम्ही फक्त परशुराम उपरकर होऊ शकता, लोकं तुमचं नाव लक्षात ठेवतील असं कार्य काहीतरी उभं करा नाहीतर तुमची ओळख राणेंचे विरोधक हीच आयुष्यभर राहणार. अशी टिका कुडाळ मालवण मतदारसंघघाचे आमदार निलेशजी नारायणराव राणे यांनी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!