कणकवली : तालुक्यातील हळवल येथील जागृत देवस्थान श्री तिटाई देवी मंदिराचा वर्धापन दिन मंगळवार दिनांक २० मे रोजी संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्तामे विविध धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी ७ वाजता श्री लिंगेश्वर मंदिरात अभिषेक व पूजा त्यानंतर श्री तिटाई देवीची पूजा व सग्रहमख चंडी याग त्यानंतर दुपारी आरती, हरिपाठ, महाप्रसाद त्यानंतर स्थानिक भजने संध्याकाळच्या सत्रात महिलांच्या फुगडी सायंकाळी ७ वाजता बुवा कौस्तुभ सरंगले रा. भरणी ता कुडाळ यांचे सुस्वर भजन त्यानंतर रात्री ८ वाजता माड्याचीवाडी ता. कुडाळ येथील सुप्रसिद्ध भजनी बुवा ऋषींकेश गावडे यांचे सुस्वर भजन होणार आहे. रात्री ९:३० वाजता हौशी दशावतार नाट्य मंडळ हळवल यांचा महान पौराणिक दशावतारी नाट्य प्रयोग सादर होणार आहे. तरी श्री तिटाई देवी मंदिर वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्व भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन हळवल वासियांच्या वतीने करण्यात आलेय.