भावना सावंत प्रथम ; संचित बांदिवडेकर द्वितीय तर युगा सावंत तृतीय
कणकवली : तालुक्यातील शंकर महादेव विद्यालय कुंभवडे या प्रशालेचा निकाल १००% टक्के लागला आहे. या प्रशालेत कु. भावना सावंत ८८:००% गुण मिळवून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तर कु. संचित बांदिवडेकर ८५:३०% गुण मिळवून द्वितीय तर कु. युगा सावंत ८३:८०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
माध्यमिक शालांत परीक्षेत २३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ७ विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले, ३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतिने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.