सेंट उर्सुला स्कूलची नक्षत्रा राजेंद्र काळे द्वितीय ; तर विद्यामंदिर कणकवली चा अथर्व परशुराम कोचरेकर तृतीय
कणकवली तालुक्यातील २४ शाळांचा निकाल १०० टक्के निकाल
कणकवली | मयुर ठाकूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा या वर्षीचा दहावीचा कणकवली तालुक्याचा निकाल ९९.२६ टक्के लागला आहे. परीक्षेस बसलेल्या एकूण १४९६ विद्यार्थांपैकी १४८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कणकवली तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान विद्यामंदिर कणकवलीची विद्यार्थींनी विधी वीरेंद्र चिंदरकर (९९.४०) व ध्रुव आनंद तेंडूलकर (९९.४०) यांनी प्राप्त केला आहे. तर व्दितीय क्रमांक सेंट उर्सुला स्कूलची नक्षत्रा राजेंद्र काळे ( ९९.२०) हिने प्राप्त केला असून तृतीय क्रमांक विद्यामंदिर कणकवलीचा अथर्व परशुराम कोचरेकर (९८.६०) याने प्राप्त केला आहे.
१) सेंट उर्सुला स्कूलचा निकाल १००% टक्के लागला आहे. या प्रशालेमध्ये कु. नक्षत्रा राजेंद्र काळे ही ९९:२०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले असून कु. पारस दिनेश वाळके ९७:८०%, कु. पार्थ संदीप राणे ९७:८०%, कु. अनोन्या अनिल तांबे ९७:८०% हे द्वितीय तर कु. ऐश्वर्या महेश कुवळेकर ९७:४०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.
२) माध्यमिक विद्यामंदिर कनेडी या प्रशालेचा निकाल १००% टक्के लागला आहे. याप्रशालेमध्ये कु. कृपा कैलास सावंत ९५:२०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तर कु. तन्वी प्रसाद राणे ९४:८०% गुण मिळवून द्वितीय तर मैत्रेयी मकरंद आपटे ९३:४०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
३) इंग्लिश स्कूल नरडवे या प्रशालेचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल १००% टक्के लागला आहे. या प्रशालेमध्ये कु. कोमल किशोर सावंत ९२:४०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. व कु. भाग्य संतोष राणे ८९:८०% गुण मिळवून द्वितीय तर कु. बकुळी दिलीप ढवळ ८५:००% गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
४) लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालय हरकुळ बुद्रुक या प्रशालेचा निकाल १००% टक्के लागला आहे. या प्रशालेमध्ये एकूण २१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. पैकी १२ विद्यार्थी विशेष श्रेणी व ९ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. यामध्ये कु. नेहा रवींद्र घाडीगावकर ९३:६०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तर कु. लीना निलेश ठाकूर ९१:४०% गुण मिळवून द्वितीय तर कु. कार्तिकी संतोष कांबळी ८९:००% गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
५) माध्यमिक विद्यालय नाटळ या प्रशालेचा निकाल १००% लागला आहे. या प्रशाले मधून एकूण ३९ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते. पैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये कु. साक्षी दयानंद गावकर ९४:२०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तर कु. स्नेहा संतोष पवार ८६:४०% गुण मिळवून द्वितीय तर कु. विशाखा मुकुंद सांगवेकर ८५:८०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
६) शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या प्रशालेचा निकाल १००% लागला आहे. या प्रशालेतून एकूण १०६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते, पैकी १०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये कु. आयुष प्रशांत मांगले ९१:४०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. तर कु. अवधूत रवींद्र गोखले ८९:६०% गुण मिळवून द्वितीय तर कु. श्रावणी श्रीकृष्ण बाणे ८६:८०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
७) शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव या प्रशालेचानिकाल १००% टक्के लागला आहे. या प्रशालेतून ३२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, पैकी ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये कु. समर्थ चंद्रकांत शिरसाट ९७:२०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. तर कु. निधी नामदेव कोरगावकर ९४:२०% द्वितीय तर कु. पार्थ रामनाथ गोसावी ९३:२०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.
८) शिक्षण प्रसारक मंडळ संचालित विद्यामंदिर हरकुळ खुर्द प्रशालेचा निकाल १००% टक्के लागला आहे. या प्रशालेमध्ये कु. स्वराली विलास भोसले ९५:६०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तर कु. संध्या दिगंबर तेली ८८:४०% गुण मिळवून द्वितीय व कु. कार्तिकी पंढरी डोंगरे ८५:४०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
९) न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट याप्रसालेचा निकाल १००% टक्के लागला आहे. या प्रशाला मध्ये कु. गोविंद राजाराम बालेघाटकर याने ९३:४०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. तर कु. दूर्वा रंजीत रेवडेकर ९३:००% गुण मिळवून द्वितीय व कु. पारस विरेंद्र रासम ९२:८०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.
१०) बाल शिवाजी इंग्लिश स्कूल या प्रशालेचा निकाल १००% टक्के लागला आहे. या प्रशालेत कु. मिथिलेश मंगेश तळदेवकर ९०:६०%, कु. ऋतिका अर्चना अंभोरकर ९०:६०% टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत तर पूजा असित दुले ८९:२०% गुण मिळवून द्वितीय तर कु. सृष्टी मिलिंद राणे ८८:६०% टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
११) अंजुमन इ खुद्दमुल मुस्लमीन हायस्कूल हरकुळ बुद्रुक या प्रशालेचा निकाल १००% टक्के लागला आहे. या प्रशालेमध्ये कु अफिफा शाहनवान डांगे ९३:८०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तर मोहम्मद उमरफारुक मुशी व रोमन नजीर सोलकर ९२:४०% गुण मिळवून द्वितीय आणि कु. सारा हमीद पटेल ९१:४०%गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
१२) विद्यामंदिर हायस्कूल कणकवली या प्रशालेचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ९९:४०% लागला आहे. या प्रशाले मधून कु. विधी विरेंद्र चिंदरकर ९९:४०% व कु. ध्रुव आनंद तेंडुलकर ९९:४०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. तर कु.अथर्व परशुराम कोचरेकर ९८:६०% गुण मिळवून द्वितीय तर देवश्री गुरुनाथ वालावलकर ९८:२०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
१३) आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे या प्रशालेचा निकाल ९३:४३% टक्के लागला आहे. या प्रशालेत कु. श्रावणी सतीश सामंत ९८:२०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे तर कु. वेद सचिन आर्लेकर ९५:२०% गुण मिळवून द्वितीय तर कु. अनुज राजा घुगे ९३:००%, कु. मन अवदेश चौहान ९३:००%, कु. हर्षिता अजित सावंत ९३:००% गुण मिळवून तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
१४) एस एम हायस्कूल कणकवली या प्रशालेचा निकाल ९७:७७% टक्के लागला आहे. या प्रशालेत कु. केतकी दत्ताराम काटे ९७:४०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तर कु वेदांग संतोष दळवी ९५:४०% गुण मिळवून द्वितीय तर कु. ध्रुवीका कृष्णा मुळदेकर ९५:००% टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
१५) माध्यमिक विद्यालय कासार्डे या प्रशालेचा निकाल ९९:१४% टक्के लागला आहे. या प्रशालेतून कु. वैदेही मधुसूदन राणे ९७:००% गुण मिळवून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तर कु. वेदिका दीपक तेली ९६:८०% गुण मिळवून द्वितीय तर कु. श्रावणी रवींद्र जाधव ९६:६०% टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
१६ ) शंकर महाविद्यालय कुंभवडे या प्रशालेचा निकाल १००% टक्के लागला आहे. या प्रशालेत कु. भावना सावंत ८८:००% गुण मिळवून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तर कु. संचित बांदिवडेकर ८५:३०% गुण मिळवून द्वितीय तर कु. युगा सावंत ८३:८०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
१७) सरस्वती हायस्कूल नांदगाव या प्रशालेचा निकाल १००% लागला आहे. या प्रशालेत कु. मंदार श्यामसुंदर हडकर ९१:८०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. तर कु. अवनी अनिल बोभाटे ९०:८०% गुण मिळवून द्वितीय तर कु. सेजल मंगेश मोरये ८९:२०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. या प्रशालेतून एकूण ५७ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते पैकी ५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
१८) अ. वि. फडणीस माध्यमिक विद्यामंदिर घोणसरी या प्रशालेचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल १००% टक्के लागला आहे. या प्रशालेतून २८ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेतून कु. चैत्राली संतोष तेली ८३:२०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तर रतन अनंत धूमक ८३:००% टक्के गुण मिळवून द्वितीय तर कु. नुपूर संदीप सुतार ८०:००% गुण मिळवून तृतीय क्रमांकचे मानकरी ठरले आहेत.
१९) नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करुळ या प्रशालेचा निकाल १००% लागला असून कु. तनुजा संतोष चौकेकर ९२:२०% टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तर कु. चैतन्य संतोष शिरसाठ ९२:००% गुण मिळवून द्वितीय तर कु. शिवराज विजयकुमार शिंदे ९०:८०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरले आहेत.
२०) वारगाव विकास मंडळ मुंबई संचलित शेठ म. वि. केसरकर हायस्कूल चा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल १००% टक्के लागला आहे. या प्रशालेमध्ये कु. सानवी संदीप मांडवकर ८९:६०%, कु. भक्ती शांताराम पाष्टे ८९:६०%, श्रवण शांताराम लिगायत ८९:६०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. तर कु. अनु महेश प्रभू ८६:२०% गुण मिळवून द्वितीय व कु. दीक्षा दीपक रांबाडे ८४:००% टक्के गुण मिळवुज तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
२१) विद्यामंदिर हायस्कूल लोरे वाघेरी या प्रशालेचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ९५% निकाल लागला आहे. या प्रशालेतून कु. सार्थक प्रशांत राणे ८४:००% गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. तर कु. समीक्षा सुनील राणे ८३:००% गुण मिळवून द्वितीय तर कु. ऋतिका उदय नवले ८१:००% गुण मिळवून तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
२२) माध्यमिक विद्यालय बिडवाडी या प्रशालेचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल १००% टक्के लागला आहे. प्रशालेतून १५ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. प्रशालेत कु. सार्थक संजय कुयेस्कर ९२:००% गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. तर कु. गार्गी अजय कदम ९८२:८०% गुण मिळवून द्वितीय तर कु. श्रावणी पुरुषोत्तम लाड ७८:२०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरले आहेत.
२३) न्यू इंग्लिश स्कूल ओसरगाव – बोर्डवे या प्रशालेचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल १००% टक्के लागला आहे. या प्रशालेत कु. आरती सदानंद गोसावी ८५:८०% गुण मिळवून प्रथम क्रमांकची मानकरी ठरली आहे. तर कु. श्रावणी दीपक तेली ७९:४०% गुण मिळवून द्वितीय व कु. सर्वेश धोंडी मोडक ७८:२०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.
२४) कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली या प्रशालेचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल १००% टक्के लागला आहे. या प्रशालेतून कु. रतन रंजीत सुतार ९३:४०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. तर कु. कुणाल रमेश वायंगणकर ९३:००% गुण मिळवून द्वितीय व कु. पायल विनोद कदम ९०:००% गुण मिळवून तृतीय क्रमांकचे मानकरी ठरले आहेत.
२५)आदर्श विद्यामंदिर सावडाव या प्रशालेचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल १००% टक्के लागला आहे. या प्रशालेतून कु. रिया भालचंद्र नरसाळे ९१:२०% गुण मिळून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तर कु. दिव्या जयवंत डगरे ८६:८९% गुण मिळवून व्दितीय तर कु. श्रेया दशरथ बिर्जे ८०:४०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरले आहेत.
२६) नॅशनल इंग्लिश स्कुल नडगिवे या प्रशालेचा निकाल १००% लागला आहे. प्रशालेतून कु. इशा मोहसीन गिरकर ९३:०२%गुण मिळवून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तर कु. फहाद हसनमिया सारंग ९२:०८% गुण मिळवून द्वितीय तर कु. सुजल रामचंद्र माहतो ९२:०२% गुण मिळून तृतीय क्रमांकचे मानकरी ठरले आहेत.
२७) तांबे एज्युकेशन सो.सं. करंजे – नागवे – साकेडी पंचक्रोशी आदर्श विद्यालय करंजे प्रशालेचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल १००% लागला आहे. प्रशालेत कु. प्रीती महेश नानचे ९२:६०% गुण प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तर गौरी संजय घोने ८९:००% गुण मिळवून द्वितीय तर कु. हर्षिता सत्यप्रकाश सावंत ८८:८०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहेत.
२८) विद्यामंदिर इंग्लिश स्कुल कणकवली च्या इंग्लिश शाखेत कु. तन्मय संतोष राणे ९०:२०% गुण मिळून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. तर कु. आर्या आनंद आचरेकर ८६:६०% गुण मिळवून द्वितीय तर कु. उत्कर्षा उमेश डावरे ८६:४०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
२९ ) वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल १००% टक्के लागला आहे. यामध्ये कु. मयुरी संतोष तळेकर ९१:६०% व कु. सावली विजय पेडणेकर ९१:६०% गुण मिळवून दोघीही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहेत. तर कु. आर्या गणेश घाडी ९१:४०% गुण मिळवून द्वितीय तर कु. मनस्वी रवींद्र बारस्कर ९१:००% गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहेत.
३०) माध्यमिक विद्यालय शेर्पे या प्रशालेचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल १००% टक्के लागला आहे. या प्रशालेत कु. राहुल विलास पांचाळ ८६:००% गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. तर कु. कोमल महेश शेलार ८०:२०% गुण मिळवून द्वितीय व कु. प्रज्योत दिलीप रामाणे ७८:६०% गुण मिळवून तृतीय क्रमांकचा मानकरी ठरला आहे.
माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.