30.5 C
New York
Monday, July 21, 2025

Buy now

पालकमंत्री ना.नितेश राणे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली : मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

त्यांचा नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे – गुरुवार ८ मे रोजी सकाळी ६: ४५ वाजता जुहू येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ,मुंबई येथे आगमन, ७ :२५ वा. मुंबई येथून विमानाने गोव्याकडे प्रयाण, सकाळी ०८:४० वा. मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण.

गुरुवारी सकाळी १० वा राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाची पहाणी, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे सकाळी ११वा शक्तीपीठ महामार्ग संदर्भात बैठकीस उपस्थिती, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने संदर्भात बैठकीस उपस्थिती, सिंधुदुर्ग ज्येष्ठ नागरीक समितीची बैठकीस उपस्थिती ,तिलारी, ता. दोडामार्ग येथील प्रकल्पग्रस्तांची बैठकीस उपस्थिती, वेंगुर्ला एस. डी. डेपो संदर्भात बैठक.
शासकीय विश्रामगृह, कणकवली येथे दुपारी ४ वा. कणकवली विधानसभा मतदार संघातील खरीप हंगाम २०२५ – २०२६ च्या नियोजनाबाबत बैठकीस उपस्थिती, दुपारी ४.३० वा. मोटारीने देवगडकडे प्रयाण सायं. ५ वा. प्रभाग १४, श्रीकृष्णनगर, देवगड जामसंडे नगरपंचायत येथील लघूनळ योजनेचा लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, सायं. ६ वा. मोटारीने कणकवलीकडे प्रयाण, सायं. ६: ३० वा. श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, पियाळी – करमळकरवाडी येथे अखंड हरिमान सप्ताहास उपस्थिती, कणकवली सायं. ७ वा. कलमठ गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेस उपस्थिती, रात्री ८ वा. मोटारीने निवासस्थानाकडे प्रयाण, असा नियोजित दौरा असल्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे संपर्क कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!