कणकवली : महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना मार्फत विविध मागण्यांसाठी राज्यस्तरीय आंदोलन सुरू आहे. यावेळी दिनांक ७ मे २०२५ रोजी कणकवली तालुका कृषी सहायक संघटने मार्फत धरणे आंदोलन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या बाहेर करण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या
कृषी सहायकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे, कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती द्यावी, डिजिटल कामकाजासाठी कृषी सहाय्यक यांना लॅपटॉप देण्यात यावा, ग्राम स्तरावर मदतीसाठी कृषी मदतनिसांची नेमणूक करावी ,कृषी निविष्ठा वाटपात वाहन भाड्याची तरतूद करावी किंवा परमिट द्वारे वाटप करावे ,कृषी विभागाच्या आकृतीबंधास तात्काळ मंजुरी देऊन कृषी सहायकांच्या पदोन्नती मधील अडथळा दूर करावा ह्या प्रमुख मागण्या आहेत
आंदोलनाचे टप्पे
५ मे – काळया किती लावून कामकाज , ६ मे –सर्व शासकीय ग्रुप मधून बाहेर पडणे ,७ मे– सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयं समोर कृषी सहायक धरणे आंदोलन करतील ,८ मे– कृषी सहाय्यक एक दिवस सामूहिक रजेवर जातील,९ मे–सर्व ऑनलाईन कामकाजावर