28.6 C
New York
Friday, July 11, 2025

Buy now

देवगड तालुक्यात न.शा. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयाची तनिष्का दळवी प्रथम ; तालुक्याचा निकाल ९७.९९%

शिरगाव ज्युनिअर कॉलेजचा रोहीत महाजन द्वितीय ; तर देवगड ज्युनिअर कॉलेजची अनुष्का तावडे तृतीय

देवगड : फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल ९७.९९ टक्के लागला आहे. न.शा. पंतवालावलकर ज्युनिअर कॉलेज, देवगड येथील कला शाखेची विद्यार्थिनी तनिष्का विनय दळवी (९१.६७ टक्के) हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. शिरगाव ज्युनिअर कॉलेजचा रोहीत राकेश महाजन (९०.६७ टक्के) द्वितीय, तर न.शा. पंतवालावलकर ज्युनिअर कॉलेजची वाणिज्य शाखेची अनुष्का संजय तावडे (९०.५० टक्के) हिने तृतीय क्रमांक मिळवला.

तालुक्यातून एकूण १०४७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते, त्यापैकी १०२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी ५८, प्रथम श्रेणीतील २८०, द्वितीय श्रेणीतील ५५७ आणि तृतीय श्रेणीत १३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

तालुक्यातील कॉलेजनिहाय निकाल पुढीलप्रमाणे :

१) न.श. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड – ९७.५४% (५७१ पैकी ५५७ उत्तीर्ण)

विज्ञान शाखा (१००% निकाल) – २१८ पैकी २१८ उत्तीर्ण

प्रथम – रोहीत प्रमोद मेस्त्री (८८), द्वितीय – अथर्व सदानंद नाईकधुरे (८३.५०), तृतीय – वेदांत संदेश सावंत (८०.५०)

कला शाखा – १३६ पैकी १२१ उत्तीर्ण (८९% निकाल)

प्रथम – तनिष्का विनय दळवी (९१.६७), द्वितीय – शौरीन संजीव देसाई (८३.१७), तृतीय – भक्ती विठ्ठल पाटणकर (७९.८३)

वाणिज्य शाखा (१००% निकाल) – २१९ पैकी २१९ उत्तीर्ण प्रथम – अनुष्का संजय तावडे (९०.५०), द्वितीय – शुभम भागवत बुधकर (८९.३३), तृतीय – प्राप्ती स्वानंद राणे (८९)

एमसीव्हीसी – ४९ पैकी ४९ उत्तीर्ण (१००% निकाल) प्रथम – प्रांजली प्रकाश घाडी (७९), द्वितीय – किरण संतोष तांबे (७८.८३), तृतीय – वैष्णवी दीपक धुरी व दिव्या गोपाळ घाडी (७८.१७)

तनिष्का दळवी हिने ६०० पैकी ५५० गुण मिळवून (९१.६७%) तालुका, केंद्र व महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला.

२) देवगड कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय (शेठ म.ग. हायस्कूल, देवगड) – १००% निकाल (१५ पैकी १५ उत्तीर्ण)

वाणिज्य शाखा : प्रथम – अपर्णा अरविंद गुरव (५६), द्वितीय – आदिती अरविंद गुरव (५३.१७), तृतीय – शिवानी प्रल्हाद पाटील (५३)

३) श्री नामदेव मोतिराम माणगांवकर कनिष्ठ महाविद्यालय, मोंड – ९५.३१% (६४ पैकी ६१ उत्तीर्ण)

प्रथम – प्रगती शैलेश टूकरल (७२.६७), द्वितीय – तृप्ती भिकाजी नरसाळे (७१.३३) तृतीय – स्वरांगी सुभाष मोंडे (७१)

४) शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिरगाव – ९९.१७% निकाल

वाणिज्य शाखा (१००%) – ८५ पैकी ८५ उत्तीर्ण

प्रथम – रोहीत राकेश महाजन (९०.६७), द्वितीय – चंदना रविकांत पवार (८९) तृतीय – वैभव गोपाळ लोके (८७.५०)

कला शाखा – ३६ पैकी ३५ उत्तीर्ण (९७.२२%)

प्रथम – हर्ष विलास खडये (६२.१७), द्वितीय – सानिका रमाकांत शिरगावकर व सनिका सचिन जाधव (५७.५०), तृतीय – गौरी सोनू झोरे (५६.१७)

५) श्रीराम माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, पडेल – ९६.२२% (५३ पैकी ५१ उत्तीर्ण)

वाणिज्य शाखा – ३४ पैकी ३४ उत्तीर्ण (१००%)

प्रथम – संचिता संतोष घाडी (७९.३३), द्वितीय – श्रुतिका संदीप घाडी (७८.८३), तृतीय – कृतिका दिलीप देवळेकर (७६.५०)

कला शाखा – १९ पैकी १७ उत्तीर्ण (८९.४७%)

प्रथम – रिया अरविंद धावरे (५७.५०), द्वितीय – पूर्वा विजय वारीक (५४.८३), तृतीय – अदिती अशोक वारीक (५४.५०)

६) कै. सौ. जानकी शिवराम राणे कनिष्ठ महाविद्यालय, मुटाट – १००% निकाल (२८ पैकी २८ उत्तीर्ण)

वाणिज्य शाखा :

प्रथम – भावेश प्रकाश मोंडे (६६), द्वितीय – पायल विठ्ठल माळकर (६५.५०), तृतीय – श्रावणी संजय भाट (६४.८३)

कला शाखा :

प्रथम – चंदना संदीप घाडी (६१.८३), द्वितीय – चंदना विजय येरम (५८.५०), तृतीय – सानिका संजय पुजारे (५६.८३)

७)श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामसंडे – ९५.४५% निकाल

इलेक्ट्रिकल विभाग (१००%)

प्रथम – पियुष दयानंद कदम (७५.३३), द्वितीय – निखील देवेंद्र घाडी (६४), तृतीय – मयुर सुनील नवलू व कुणाल धनंजय सावंत (६३.३३)

इलेक्ट्रॉनिक्स विभाग – ९०.९%

प्रथम – साईल सचिन घाडीगावकर (६७.१७), द्वितीय – जगदीश यशवंत सारंग (६५.१७), तृतीय – हर्ष अनिल राणे (६४.८३)

८) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, फणसगाव – १००% निकाल (८४ पैकी ८४ उत्तीर्ण)

वाणिज्य – ५४ पैकी ५४ उत्तीर्ण

प्रथम – जान्हवी शंकर गुरव (८१.६७), द्वितीय – वत्सला परशराम अनभवणे (७८.५०), तृतीय – सर्वेश सुनील दुसणकर (७४.१७)

कला शाखा – ३० पैकी ३० उत्तीर्ण

प्रथम – अमिषा दीपक बाणे (६३.३३), द्वितीय – चंदना मंगेश पाटील (५८.५०), तृतीय – प्रतीक्षा प्रकाश फाले (५८.३३)

९) मिठबांव ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स – १००% निकाल

प्रथम – विद्या अ. टेली (५५), द्वितीय – अनुजा म. धुवाळी (५३.८३), तृतीय – निकेश रा. कोळंबकर (५२)

१०) ई.बी.टी. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, ठाकूरवाडी – १००% निकाल (२३ पैकी २३ उत्तीर्ण)

विज्ञान शाखा – १५ पैकी १५ उत्तीर्ण, वाणिज्य शाखा – ८ पैकी ८ उत्तीर्ण

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!