22.2 C
New York
Tuesday, August 5, 2025

Buy now

घरानजिकच्या विहिरीत युवकाने केली आत्महत्या | ओटवणे येथील घटना

ओटवणे : ओटवणे करमळगाळू येथील मकरंद खेमदास नाईक ( वय २४ ) हा युवक आपल्या घरानजिक विहिरीत मृतावस्थेत आढळला. मकरंद हा सकाळीच घरातून बाहेर गेला होता. सकाळ पासून मकरंद न दिसल्याने सर्वत्र शोधा शोध करण्यात आली. त्यावेळी त्याची चप्पल वीहीरीवर असल्याचे निदर्शनास आले.  त्यामुळे विहिरीत डोकावल्यावर मकरंद विहीरीत मयत स्थितीत आढळला. या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, हेड कॉन्स्टेबल संतोष गेलोलो, हे घटनास्थळी पोचले. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आला व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. याबाबत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली.

दोन वर्षांपूर्वी मकरंद याच्या आईनेही विहिरीत उडी घेत आत्महत्या केली होती. तर गेल्यावर्षीच त्याच्या काकाचे हृदय विकाराने निधन झाले होते. मिळालेल्या माहिती नुसार बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेला.

मकरंद हा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त होता. डॉ. लेले आणि सध्या डॉ. पाटकर यांच्याकडे तो उपचार घेत होता. तीन वर्षात नाईक कुटुंबियांवार धक्यावर धक्के बसत असून या घटनेमुळे नाईक कुटुंबियांवार दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात वडील, बहीण, भाओजी असा परिवार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!