कणकवली : कुर्ली येथील शेतकरी संतोष धाकू हुंबे यांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. त्यांच्या खात्यावरील ५५ हजार रुपये दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर झाले आहेत. याबाबत त्यांनी कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
संतोष हुंबे यांच्या मोबाइलवर केवायसी अपडेट करण्यासाठी एसएमएस आला होता. या मेसेजवरील लिंक त्यांनी ओपन केली असता त्यांच्या बँक खात्यातील ५५ हजार रुपये गायब झाले आहेत. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी खाते असलेल्या बँकेत जाऊन याबाबत खात्री केली. त्यावेळी बँकेतील कर्मचा-यांनी खात्यातील पैसे अज्ञाताचा खात्यावर ट्रान्सफर झाल्याचे सांगितले.