तहसीलदार दिक्षांत देशपांडेची उपस्थिती
स्वच्छतेबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन…
कणकवली : तालुक्यातील करूळ येथील भास्कर कर्णिक हुतात्मा स्मारकाच्या परिसरात आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत कणकवलीचे तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली यावेळी स्वच्छतेबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तहसीलदार देशपांडे यांच्या प्रेरणेने आणि करूळच्या सरपंच समृद्धी नर, करूळ हायस्कूलचे मुख्याध्यापक लक्ष्मण नारकर, तसेच स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. सकाळी ८ वाजता मोहिमेचा प्रारंभ झाला आणि ९. ३० वाजेपर्यंत स्मारकाचा परिसर स्वच्छ करण्यात आला. या दरम्यान स्मारकाच्या आजूबाजूची झाडी तोडण्यात आली, पालापाचोळ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. यासोबतच प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर कचरा गोळा करण्यात आला. मोहिमेच्या सुरुवातीला स्वच्छता मिशनचे स्वच्छता दूत गणेश जेठे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर शिक्षक सिद्धेश खटावकर यांनी स्वच्छतेची शपथ दिली, तर करूळ गावचे पोलीस पाटील गणेश जाधव यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. याप्रसंगी तहसीलदार देशपांडे यांनी स्वच्छतेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी जिल्ह्यात स्वच्छता मोहीम चालवणाऱ्या स्वच्छता मिशनच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. सरपंच समृद्धी नर यांनी करूळ गावात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविल्या जातात, असे सांगून सर्वांचे आभार मानले. मुख्याध्यापक नारकर यांनीही स्वच्छतेचे महत्त्व विषद करत सहभागींचे आभार व्यक्त केले. महसूल अधिकारी दिलीप पाटील यांनी यापुढेही सर्वांनी स्वच्छतेच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. या स्वच्छता मोहिमेत महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सत्यवान माळवे, पत्रकार संजय सावंत, सचिन राणे, गुरु सावंत, तुषार नेवरेकर, मोहन पडवळ, प्रदीप फोपे, आनंद उर्फ बाबू परब, अनिल मेस्त्री, मंडल अधिकारी प्रवीण मुंडे, तरळे पोलीस पाटील, चंद्रकांत जाधव, बापू जाधव, एस. एन. खाडे, करूळ ग्राम महसूल अधिकारी समृद्धी गवस, आरोग्य समुदाय अधिकारी तेजस्वी पारकर, आरोग्य सेविका वंदना मराठे, संपदा कुडतरकर, करुणा सरवणकर, सुदर्शन फोपे, दिलीप कदम, श्रेया हरियाण, प्रमिला कदम, महसूल अधिकारी शुभम भालेराव, आर. व्ही. इनकर, टी. डी. चिकणे, बी. के. मानवर, अक्षता बागवे, रती घोडके, हेमा तोरस्कर, दत्ता डाके, मंडल अधिकारी संतोष नागावकर, मंगल गायकवाड, एस. आर. राणे, अर्जुन गुनावत, गणेश गोडे, पी. आर. कोळपकर, उत्तेश्वर मुंडे, राजेश शिरवलकर, सोमनाथ देशमुख, सुरज शिंदे, अजय मांडेकर, नितीन डाके, नितीन राव राणे, भारत नेवारे, जगदीप चाळके, व्ही. एस. रासम, प्रियंका मोंडकर, प्रियंका जेठे, अवनी धोपटे, मनू धोपटे, शिक्षक निलेश फोंडेकर, विनोद मिस्त्री, करूळ हायस्कूलच्या एनसीसीच्या कामया राणे व इतर विद्यार्थिनी, तसेच स्काऊट गाईडच्या हर्षदा वर्दम व इतर विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.