27.7 C
New York
Monday, July 21, 2025

Buy now

सावडाव विनयभंग प्रकरणातील आरोपींचा जामीन फेटाळला.!

कणकवली : तालुक्यातील सावडाव येथील माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्त्या सौ. नयना वैभव सावंत यांना अमानुषपणे मारहाण करून त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले सावडावचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच दत्ताराम मनोहर काटे व त्यांचे सहकारी संदीप मनोहर काटे, व्यंकटेश हरि वारंग, संतोष सुरेश साळुंखे, गणेश रमेश काटे यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. विनयभंग प्रकरणाची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

सौ. नयना सावंत व त्यांचे पती वैभव सावंत हे माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतात. त्याअनुषंगाने सावडाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या स्ट्रीट लाईट व रस्त्याच्या कामामध्ये झालेला भ्रष्टाचार त्यांनी माहितीच्या अधिकारात उघड केला. याच रागातून सावडावचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच दत्ताराम काटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दि. १३/ ०४ /२०२५ रोजी सायंकाळी ७.३० वा. च्या सुमारास सौ. नयना सावंत यांना अमानुषपणे मारहाण केली. त्यांच्या अंगावरील जॅकेट जबरदस्तीने काढले व जॅकेटच्या आत असलेले टी शर्ट काढण्याचा प्रयत्न करून त्यांचा विनयभंग केला तसेच जबर मारहाण करत मनात लज्जा होईल अशी अश्लील वक्तव्ये करून दत्ताराम काटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नयना सावंत यांना शिवीगाळ करत व धमकी दिली. तसेच वैभव सावंत यांच्या गुप्तांगावर देखील धारधार शस्त्राने हल्ला करून मोठी जखम करून त्यांना जीवे मारण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी दत्ताराम मनोहर काटे व त्यांच्या सहकाऱ्यांना कणकवली पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती.

दत्ताराम काटे यांनी जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र विनयभंग प्रकरणाची न्यायालयाने गंभीर दखल घेत दत्ताराम काटे व सहकाऱ्यांचा जामीन फेटाळला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!