26 C
New York
Monday, July 21, 2025

Buy now

सिंधुदुर्गात गौण खनिजाची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाहतूक सुरु

माजी आमदार परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

दखल घ्या अन्यथा न्यायालयात व लोकायुक्तांकडे दाद मागणार

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू आणि खडी आणि चिरे मोठ्या प्रमाणात गोवा राज्य आणि कर्नाटक राज्यात वाहतूक केली जात आहे. सदर वाळू वाहतूक करताना एका गाडीला आपल्याकडील दोन ब्रासचा पास वापरला जातो व त्याच पासवर ६,८,१० ब्रासवर वाळू, चिरे, खड़ी मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. याबाबत दोन ते तीन वेळा प्रत्यक्ष आपल्याशी भेटून चर्चा केली आहे. गौणखनिज वाहतूक सूर्यास्तापासून सूर्यमावळेपर्यंत वाहतूक करावयाचे असताना दिवस रात्र मोठ्या प्रमाणात वाळू, चिरे, खडी गौणखनिज वाहतूक केली जात आहे. अशा आशयाचे निवेदन माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. या निवेदनात पुढे म्हटले आहे, याकडे आपले खणीकर्म विभाग प्रांत अधिकारी तहसीलदार सावंतवाड़ी है आर्थिक गैरव्यवहारातून मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. या सर्व अधिकाऱ्यांचे महिन्याचे हप्ते ठरलेले असून प्रत्येक अधिकारी महिन्याला १० ते २० लाख हप्ते गोळा करत आहेत. व शासनाच्या कोट्यावधीचा महसूल डुबवत आहे. व त्यावर नियंत्रण ठेवणे ही तुमची जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी आहे. आपल्या गोव्याच्या सीमेवर बांदा येथे व कर्नाटकच्या सीमेवर आंबोली येथे सीसीटीव्ही बसवलेले असताना ते सीसीटीव्ही एका कुठेतरी बाजूला असल्याने ते सीसीटीव्ही फुटेज मध्ये येऊ नये म्हणून दुसऱ्या बाजूने ते वाहतूक करतात. याकडे पोलीस आरटीओ यंत्रणा आणि आपली महसूल यंत्रणा आर्थिक तडजोडीतून गाड्या सोडतात असतात. व त्याकडे पूर्णता दुर्लक्ष करतात. व त्या गाड्या राज्याच्या सिमेवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक करतात. तरी वरील महसूल चुकवेगिरी करणारे आणि सूर्यास्तानंतर सूर्यउद्योय होण्यापूर्वी वाहतूक करतात. ही वाहतूक शासन परिपत्रकाप्रमाणे त्वरित थांबवण्यात यावी. व कमी ब्रास वापरुन जास्त ब्रास वाहतूक करत असल्याने शासनाच्या महसुलाची चोरी करत असलेल्या विरोधात कारवाई करण्यात यावी. अन्यथा या विरोधात न्यायालय लोकआयुक्त यांच्याकडे दाद मागावी लागेल याची नोंद घ्यावी असा इशारा श्री उपरकर यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!