सिंधुदुर्ग : जांभूळ हे फळ एक प्रसिद्ध आणि आरोग्यास उपयुक्त असं फळ आहे. जांभूळ या फळात आरोग्यदायी गुणधर्म देखील मोठ्या प्रमाणात आहेत. मधुमेह नियंत्रणासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी गुणकारी आहे. जांभूळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते, ज्यामुळे मानवी शरीराची हाडे मजबूत करतात.
हे आहेत जांभूळ फळ खाण्याचे फायदे –
जांभूळाचा रस आणि बियांचे सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे आपल्याला होणारे विविध आजार दूर राहतात. त्याचप्रमाणे जांभूळ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता, ॲसिडिटी आणि इतर पोटाच्या समस्या दूर होतात. जांभूळ रक्तातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते आणि रक्त शुद्ध करते. जांभूळ कमी कॅलरीज आणि उच्च फायबर असलेले फळ आहे. जे वजन कमी करण्यास मदत करते. जांभूळ किडनी स्टोनच्या समस्येवर देखील उपयुक्त आहे. दातदुखी, हिरड्या सुजणे आणि दात कमजोर होणे यांवर उपायकारक आहे. जांभळाच्या झाडाच्या सालीचा काढा करून गुळण्या केल्यास त्रास कमी होतो. मुखशुद्धी होते. जांभूळ फळ हे पर – परागीभवन होणारे फळपीक आहे, आणि फळे १५ ते ४० च्या घोसाने लागतात. जांभूळ हे उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय हवामानामध्ये वाढते. जांभूळ हे एक मौसमी फळ आहे, आणि ते साधारणपणे जून महिन्यामध्ये पिकते. जांभूळ हे एक पौष्टिक आणि आरोग्यदायी फळ आहे, ज्याचा आहारात समावेश करणे फायद्याचे आहे.
जांभळाचा रस पिण्यामुळे नजर सुधारते. जांभळामुळे शरीरातील डोळ्यांना कनेक्ट होणारे सर्व टिश्यूज आणि डोळ्यातील कॉर्निया निरोगी राहतो. डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारा व्हिटॅमिन सीचे जांभूळ हे मुख्य स्त्रोत आहे.
जांभळामध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे रक्त शुद्ध राहण्यास मदत होते. परिणामी त्वचेचे आरोग्य आणि पोत सुधारतो. जांभळामधील गुणधर्म मुरुम, डाग, सुरकुत्या आणि पिंपल्स होण्यापासून देखील प्रतिबंधित करते.