17 C
New York
Wednesday, September 3, 2025

Buy now

घाटात कारला लागली आग – जळून खाक

वैभववाडी : गगनबावड्यापासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर करुळ घाटातील महादेव मंदीराजवळ नेक्सान कारने (गाडी नं.MH09EU1981) अचानक पेट घेतला. या आगीत ही गाडी पुर्णतः जळून खाक झाली. ही घटना रात्री आठच्या सुमारास घडली. या दुर्घटनेमुळे करुळ घाटातील वाहतूक एक तास ठप्प झाली होती.

रुकडी माणगाव, ता.हातकणंगले येथील एक कुटुंब वैभववाडीत आले होते. सायंकाळी साडेसात वाजणेच्या सुमारास वैभववाडी येथून हे कुटूंब कोल्हापूरकडे जाण्यास निघाले. करुळ घाट संपल्यावर कोल्हापूर हद्दीत महादेव मंदीरानजीक ही गाडी आली असता ती अचानक बंद झाली. चालकाने बाहेर येऊन पाहीले असता गाडीच्या इंजिनकडील बाजूने धूर येत असल्याचे लक्षात येताच गाडीत असणाऱ्या कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढले. गाडीवर पाणी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तेवढ्यात आगीने रौद्र रूप धारण केले. गगनबावडा ते तळेरे या रस्त्याचे काम करणारे ठेकेदार मिलिंद वेल्हाळ यांनी गाडीची आग विझवण्याकरता पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले. दरम्यान या घटनेमुळे करूळ घाटातील वाहतूक एक तास ठप्प झाली होती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!