राजकोट किल्ल्याच्या ठिकाणी राणे पित्रा-पुत्रांच्या धिंगाण्यामुळे बदनामी झाली
कणकवली : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नव्याने ६० फुटी पुतळा उभारण्यात आला आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंद, पालकमंत्री नितेश राणे यांना पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी वेळ नाही, ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे, अशी टीका शिवसेना उबाठा पक्षाचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळ्या पडल्याप्रकरणात दोषी असणाऱ्यांवर सरकारने काय कारवाई केली, असा सवालही त्यांनी केला.
येथील संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. उपरकर बोलत होते. उपरकर म्हणाले, छत्रपती शिवरायांची निर्माण केलेल्या आरमाराला ३५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्यसाधून राजकोट किल्ल्यावर घाईगडबडीत शिवरायांचा भव्य पुतळ्या उभारण्यात आला. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. हा पुतळ्या बांधण्यासाठी ८ ते १० कोटींच्या खर्च करण्यात होता. पुतळा निकृष्ट दर्जाचे काम झालेल्याने शिवरायांचा पुतळा पावसाळ्यात पडला. त्यामुळे ८ ते १० कोटी रुपयांचा चुरडा झाला. याप्रकरणात दोषी केवळ शिल्पकारावर कारवाई झाली. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, असे उपरकर म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुतळ्या पडल्यानंतर त्याठिकाणी पुन्हा पुतळ्या उभारण्यासाठी नव्याने निविदा काढून पुतळा उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. सध्या स्थितीत शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला. महाराष्ट्र व कामगार दिन व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्थापना दिवस १ मेचा मुहूर्त साधून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी पुतळ्याचे अनावरण केले पाहिजे होते. मात्र, त्यांना अनावरण करण्यासाठी वेळ नाही, हा शिवरायांचा अपमान असून महाराष्ट्राची शोकांतिका आहे, अशी टीका उपरकर यांनी केली. खासदार नारायण राणे यांच्या करंजे येथील गोवर्धन गोशाळेच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ११ मे रोजी येणार असून या दिवशी शिवरायांचा पुतळ्याचे अनावरण होणार असल्याची चर्चा आहे. यावरून मुख्यमंत्री व राज्य सरकार शिवरायांना दुय्यम स्थान देत आहे, हे दिसून येते.
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा ६० फूटी दिमाखात उभारण्यात आला आहे. पुतळ्याच्या उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च पुन्हा करण्यात आला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना पुतळ्याचे अनावरण करण्यास वेळ मिळत नसेल तर सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करावे, असा सल्ला उपरकर यांनी देतानाच शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर किल्ल्याच्या ठिकाणी राणे पित्रा-पुत्रांनी जो धिंगाणा घातला तो देशवासीयांनी बघितला. त्यामुळे महाराष्ट्र व सिंधुदुर्गवासीयांची बदनामी झाली आहे, असे उपरकर यांनी सांगितले.