25.6 C
New York
Wednesday, August 6, 2025

Buy now

आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा

महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : लाडकी बहिण योजनेंतर्गत शुक्रवारपासून एप्रिल महिन्याचा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. अशी माहिती महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थीना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे.” असं त्यांनी आपल्या द्वीटमध्ये म्हटलं आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!