25.6 C
New York
Wednesday, August 6, 2025

Buy now

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांवर कडक कारवाई करा !

सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने पंतप्रधानांकडे मागणी ; तहसीलदारांना निवेदन

कणकवली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना शोधून कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवेदन पंतप्रधानाना देण्यासाठी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, जन्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवा‌द्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या घटनेचा सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन तीव्र निषेध करत आहे. हा हल्ला करणाऱ्या दहशतवा‌द्यांना त्वरित शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करत दहशतवाद्यांवर जरब बसवली पाहिजे. त्यासाठी त्यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना शासनाने पुरेशी आर्थिक मदत करून त्यांचे पुनर्वसन करावे.असेही म्हटले आहे.

हे निवेदन देताना संघटनेच्या अध्यक्षा सिमरन तांबे, सचिव प्रियांका तावडे, सदस्य माधुरी परब, साक्षी सावंत, वैशाली गुरव,मेघना पांचाळ, सुनीता पवार, गार्गी नेमळेकर आदी उपस्थित होत्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!