23.3 C
New York
Tuesday, July 15, 2025

Buy now

माध्यमिक शिक्षण विभागाच्या विरोधात लाक्षणिक उपोषण!

माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी सहभागी

सिंधुदुर्ग : माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची कामे निकाली निघत नसल्याने आज शिक्षणाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी जिल्हा परिषद भवन समोर शिक्षकेतर कर्मचारी उपोषणास बसले आहेत.यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल राणे, कार्याध्यक्ष प्रदीप सावंत जिल्हा सचिव तथा विभागीय सचिव गजानन नानचे, उपाध्यक्ष सुहास देसाई, लाडू जाधव सहसचिव यादवराव ठाकरे, कैलास घाडीगावकर, जिल्हा संघटक निलेश पारकर, विनायक पाटकर, सुधाकर बांदेकर, बळीराम सावंत ,गणेश देसाई, शरद कांबळे, वैभव केकरे, भिवा धुरी, सुमन राऊळ, सुधाकर रेमुलकर, प्रशांत कदम, संदीप जाधव, काशीराम राणे,शरद देसाई, संतोष राणे,विठ्ठल धोंड, राजेंद्र शेटकर , निरंजन लाखे, शाबी तुळसकर, बाबी लोंढे, रामा गवस, दिपक गवस,आदी सह जिल्ह्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष वामन तर्फे, अध्यापक संघ अध्यक्ष अजय शिंदे,शिक्षक भारती संघटनेच्या वतीने संजय वेतुरेकर, आदींनी पाठिंबा दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग हे कायमच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मागण्यांकडे डोळे झाक करून दुर्लक्ष करतात गेल्या दोन वर्षापासून भविष्य निर्वाह निधी फंडाच्या पावत्या काही शाळांना अद्याप मिळालेल्या नाहीत. पदोन्नतीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. पदोन्नतीसाठी किंवा मान्यतेसाठी उच्च न्यायालयाचे आदेश असून सुद्धा शिक्षणाधिकारी मान्यता देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा विविध मागण्यांसंदर्भात शिक्षकेतर संघटनेने १८ मार्च रोजी आंदोलन पुकारलेले होते. त्यावेळी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी यांना चर्चेस निमंत्रित करून प्रलंबित असलेले प्रश्न आठ दिवसात निकाली काढणार असे आश्वासन दिल्याने सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. परंतु दिलेल्या आश्वासना पासून एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे तरी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत वारंवार लेखी पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्ष भेटून सुद्धा प्रश्न निकाली काढल्या जात नसल्याने तसेच सहविचार सभा सभेमध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने आज अखेर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा कुठलाही प्रश्न सुटलेला नाही. या विरोधात आज शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद भवन सिंधुदुर्गनगरी येथे सकाळी साडेदहा वाजले पासून लाक्षणिक उपोषण सुरू आहे पुढील मागण्यांसंदर्भात शिक्षकेतर संघटनेतर्फे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये मान उच्च न्यायालय मुंबई न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे व पदोन्नतीस मान्यता देणे याबाबत कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी सुद्धा वारंवार आमच्या मागण्यांसंदर्भात शिक्षणाधिकारी यांना सुचित केलेले होते परंतु आमदार महोदय यांचे आदेश किंवा सूचना सुद्धा शिक्षणाधिकारी पाळत नाहीत तसेच शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांनी सुद्धा सूचना देऊनही हेतू पुरस्कर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सदर मागण्यांबाबत टाळाटाळ व डोळेझाक करीत आहेत. संवर्ग बदलाने शिपाई प्रवर्गातून कनिष्ठ लिपिकपदी पदोन्नती, नवीन शिक्षकेतर पदभरती मान्यता देणे, जानेवारी २०२४ पासून शिक्षकेतरांना २४ वर्षानंतर मिळणारी दुसरी कालबद्ध पदोन्नतीचे प्रस्ताव धूळखात पडलेले आहेत त्यास मंजुरी देणे सन २०१८ – १९ पासून ची प्रलंबित पुरवणी फरक बिल, न्यायालयीन फरक बिल, वैद्यकीय बिल मंजूर करणे, दोन वर्षापासून प्रायव्हेट फंड पावत्या काही शाळांना मिळालेल्या नाहीत त्या तात्काळ मिळाव्यात. १५ मार्च २०२४ चा शिक्षकांवर आघात करण्यात येणारा आदेश रद्द करण्यात यावा. या आदेशामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण घेणे सुद्धा कठीण होणार आहे. वरिष्ठ लिपिक हे अतिरिक्त ठरत होते त्यामुळे त्यांचे समायोजन झाल्याशिवाय पदोन्नती, संवर्ग बदल पदोन्नती व नवीन नियुक्ती त्यांना मान्यता देता येणार नाही असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सुचित केले होते परंतु वरिष्ठ लिपिक यांचे समायोजन पूर्ण झालेले असताना सुद्धा अध्यापही सदर मान्यता शिक्षणाधिकारी देण्यास दुर्लक्ष करीत आहेत सहविचार सभेत ठरल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रस्तावास लागणाऱ्या कागदपत्रांची विषय सूची मिळण्याची मागणी केली होती ती सुद्धा अद्याप या कार्यालयाने दिलेली नसल्याने या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये शिक्षक, शिक्षकेतरांचे कुठलेही काम व्यवस्थितपणे होत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज रोजी लाक्षणीय उपोषण केले आहे. एक महिन्याच्या आत प्रलंबित कामाची पूर्तता न झाल्यास मान. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष अनिल राणे यांनी दिला आहे. यावेळी जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!