21.3 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

सुकळवाड येथे १ मे पासून दशावतारी नाट्य महोत्सव

कणकवली : सुकळवाड येथील श्री देव ब्राह्मण येथे ५ मे रोजी श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त अरुण बाबाजी हिंदळेकर स्मृती दशावतारी नाट्य महोत्सव १ ते ५ मे या कालावधीमध्ये आयोजित केला आहे. १ मे रोजी सायंकाळी ७ वाजता चेंदवणकर गोरे दशावतार मंडळ, कवठी यांचा ‘ब्रह्मशाप’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. २ मे रोजी सायंकाळी ७वाजता सावरेश्वर दशावतार मंडळ, आवेरा यांचा ‘त्रिनेत्रधारी अष्टभुजा नारी’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

३ मे रोजी सायंकाळी ७ वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ, वेंगुर्ला यांचा ‘जय जय गौरीशंकर’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. ४ रोजी सायंकाळी ७ वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळ, वेंगुर्ला यांचा ‘वीर बब्रुवान’ नाट्यप्रयोग सादर होणार आहे. ५ रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता महाआरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ७वाजता वालावलकर दशावतार मंडळ, वालावल यांचा ‘अजराज’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव ब्राह्मण सेवा समितीने केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!