28.2 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

कणकवलीतील ८ कराटेपटूंचा तायक्वांदो “ब्लॅक बेल्टने” सन्मान

कणकवली : वर्ल्ड तायक्वांदो फेडरेशन, तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू होरायझन पब्लिक स्कूल, नवीन पनवेल येथे तायक्वांदो ब्लॅक बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातुन खेळाडू सहभागी झाले होते. तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग तर्फे कणकवलीतील आठ विद्यार्थी सहभागी झाले होते. कणकवलीतील मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अकॅडमीच्या या आठ विद्यार्थांनी तायक्वांदो खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करुन ब्लॅक बेल्ट होण्याचा मान मिळवला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. मुले – ओंकार मिलिंद पाटील, लीनेश सत्यवान कदम, वेदांत संतोष धनवटे मुली – सोनिया संजय ढेकणे, दुर्वा दिलीप सरूडकर, गार्गी अविनाश सावंत, दुर्वा संतोष गावडे, ऋतुजा राजेश शिरवलकर. ही ब्लॅकबेल्ट परीक्षा तायक्वांदो आंतरराष्ट्रीय पंच तथा तायक्वांदो असोसिएशन ऑफ रायगडचे सचिव सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) चे महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश कर्रा, मुंबईचे सचिव विजय कांबळे, लक्ष्मण कर्रा आदी मान्यवर उपस्थित होते. यशस्वी सर्व विद्यार्थी कणकवली येथील नगरवाचनालय सभागृहात मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अकॅडमी मार्फत सुरू असलेल्या तायक्वांदो प्रशिक्षण वर्गात गेली पाच वर्ष राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक एकनाथ धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे पदाधिकारी व राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक भालचंद्र कुळकर्णी, सुधीर राणे, विनायक सापळे, अमित जोशी यांनी अभिनंदन केले आहे. फोटो ओळ – कणकवली येथील तायक्वांदो ब्लॅक बेल्ट स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांसोबत तायकांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई)चे महासचिव मिलिंद पठारे ,आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक सुभाष पाटील, व्यंकटेशराव कर्रा ,विजय कांबळे,एकनाथ धनवटे आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!