बांदा : आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर धर्मांध स्टेटस ठेवल्याप्रकरणी बांदा पोलिसात तक्रार दाखल झालेल्या “त्या” महिला शिक्षिकेवर आज बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी दिली. यासंदर्भात काल हिंदू एकता मंचने बांदा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. बांदा शहरातील महिला शिक्षिकेने काल रात्री आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर धर्मांध स्टेटस ठेवल्याने हिंदू एकता मंच आक्रमक झाले होते. बांदा पोलीस ठाण्यात कालच तक्रार अर्ज देण्यात आला होता. त्यानुसार आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.