20.3 C
New York
Friday, August 22, 2025

Buy now

पाकिस्तानचा झेंडा जाळून काश्मीर हल्ल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कणकवलीत केला तीव्र निषेध

मोदी-शहा, सरकार पाडण्यात,पक्ष फोडण्यात व्यस्त,देशातील नागरिकांना सुरक्षा देण्यात मात्र अपयशी

वैभव नाईक, जीजी उपरकर, सतीश सावंत, संदेश पारकर, सुशांत नाईक यांचा घणाघात

कणकवली : जम्मू -काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज कणकवली पटवर्धन चौकात तीव्र स्वरूपात निषेध केला. यावेळी पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून तो जाळण्यात आला. यावेळी मुडदाबाद, मुडदाबाद पाकिस्तान मुडदाबाद! एक-दो, एक-दो पाकिस्तान को फेकदो, केंद्र सरकार हाय हाय! अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर,जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. शिवसेना नेते आणि शिवसैनिकांनी हाताला काळ्या फिती बांधून हल्ल्याचा निषेध नोंदविला तसेच या अतिरेकी हल्यात मृत पावलेल्या नागरिकांसाठी दोन मिनिट स्तब्ध उभे राहत श्रद्धांजली वाहण्यात आली.

केंद्र सरकार देशातील नागरिकांना सुरक्षा देण्यात कमी पडल्याने निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मोदी आणि शहा हे गेली १० वर्षे सरकार पाडणे आणि पक्ष फोडण्यात व्यस्त असल्याने देशातील सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहेत. दहशतवादी देशात घुसून नागरिकांना गोळ्या घालत आहेत हे केंद्र सरकारचे अपयश आहे. या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अनेक लोक अडकले आहेत त्यांना मागे येण्यासाठी सुविधा नाहीत मात्र महाराष्ट्रातील काही नेते काश्मीर मध्ये जाऊन फोटोसेशन करत आहेत त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो अशा शब्दात माजी आमदार वैभव नाईक, जीजी उपरकर, सतीश सावंत, संदेश पारकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर,तालुका संघटक राजू राठोड, शहरप्रमूख रुपेश नार्वेकर,राजू शेटये,महेश कोदे,बंडू चव्हाण,अनुप वारंग,माधवी दळवी,संजना कोलते,दिव्या साळगावकर, धनश्री मेस्त्री,प्रतिभा अवसरे, अजय सावंत,योगेश मुंज,अजित काणेकर, उत्तम लोके, वैभव मालंडकर, संतोष पुजारे,रोहित राणे,नितीन राऊळ,अरुण परब,रामा राणे,लक्ष्मण हन्नीकोड, बाबू केणी,रवी परब,उद्धव पारकर,सार्थक ठाकूर आदिंसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!