18.8 C
New York
Saturday, April 19, 2025

Buy now

कणकवली वरवडेत ३८ जणांवर मधमाश्यांच्या हल्ला | एक गंभीर जखमी

कणकवली : तालुक्‍यातील वरवडे – फणसनगर येथील चर्चच्या ठिकाणी गुड फ्रायडे निमित्त कार्यक्रम सुरू होता. मिळालेल्या माहितीनुसार कार्यक्रमावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीच्या हातात काठी होती. चुकुन ती काठी बाजूला असलेल्या मधमाशीच्या पोळ्याला लागली. त्याच दरम्यान मधमाश्यांनी तेथे असलेल्या नागरिकांवर हल्ला केला. ही घटना शुक्रवारी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये सुमारे ३८ ख्रिश्चन बांधव जखमी झाले आहेत. उपचारासाठी जखमींना तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तर मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात गार्बील फर्नांडिस ( वय ५५, रा. वरवडे ) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकऱ्यांनी दिली. तर जुझे आवेलीन फर्नांडिस (५३, रा. फोडा), जेराॅन पेद्र बारेत (५३, रा. फोडा), स्विडेल सिसाव बारेत (६ रा. घोणसरी), नलालीन सिसाव बारेत (३७, रा. घोणसरी), एेजल सिसाव बारेत (१०, रा. घोणसरी), मॅटी सिसाव बारेत (१६, रा. घोणसरी), प्राजल विजय रासद (१६, रा. घोणसरी), सिसाव पेद्रू बारेत (४०, रा. घोणसरी), जोसाविन फ्रान्सिस फर्नांडिस (४०, रा. फणसवाडी), सिनेरा फ्रान्सिस फर्नांडिस (१०, रा. फणसवाडी), जाॅन फर्नांडिस (५९, रा. फणसवाडी), जोहान लाॅरेन फर्नांडिस (१४, फणसवाडी), सेरेयिन जाॅन फर्नांडिस (६०, रा. फणसवाडी), पूजा अन्थोन म्हापसेकर (३०, रा. साकेडी), शोबिना संतान म्हापसेकर (५१, करूळ), रोजीना जाॅन फर्नांडिस (५८, रा. फणसवाडी), पेरेपेलिन जाॅन पिंटो (३३, रा. घोणसरी), बितोज रिजाॅल फर्नांडिस (५५ रा. कणकवली), शेजालिन बस्ताव पिंटो (४५, रा. फोंडा), जेबेलिन मेंगले पिंटो (६१, रा. घोणसरी), प्रेसिल कोजमा बारेन (४६, घोणसरी), आग्नेल बाब्रील डिसोजा (५८, रा. फणसवाडी), देवदिन आग्नेल डिसोजा (५२, रा. फणसवाडी), लाॅरेन्स कोखताल करवाले (५४, रा. फोंडाघाट), जाॅन कैताल पिंटो (५९, रा. फोंडा), बेनी बस्ताव फर्नांडिस (६४, रा. फणसवाडी), बॅनी जेमेमीन फर्नांडिस (४२, साकेडी), लाॅरेन्स जुवा डिसोझा (५५, रा. साकेडी), सॅमिअाॅल रफाईल फर्नांडिस (१५, फणसवाडी), क्रिजाल इनास्ट फर्नांडिस (५४, कणकवली), सलोनी कमिद म्हपसेकर (२४, रा. साकेडी), हिमील जासिन लोबो (५४, रा.फणसवाडी), सोनाली प्लेजट लोबो (२८, रा.फणसवाडी), जासिन्त मार्शल लोबो (५८, रा.फणसवाडी), नेविल बेना फर्नांडिस (३४, रा.फणसवाडी), पाशव इशान फर्नांडिस (६१, फणसवाडी), रफाईल सालू फर्नांडिस (५०, वरवडे) अशी जखमींची नावे आहेत.

घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप, किरण मेथे यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज पाटील, डॉ.अक्षय पाटील, डॉ. अजय शृंगारे, डॉ. सुजीता मंचिकलपुडी, डॉ. चंद्रतेज बी यांच्या सहित प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकारी तसेच परिचारिका नुपूर पवार, दिपाली ठाकूर, नयना मुसळे आदींनी उपचार केले. या घटनेने कणकवली शहरात एकच खळबळ उडाली होती. दैव बलवत्तर म्हणून मधमाश्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाली नाही.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!