कणकवली : वरवडे फणसनगर येथील चर्चच्या ठिकाणी गुड फ्रायडे निमित्त कार्यक्रम सुरू असताना अचानक मधमाशांनी हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन बांधव जखमी झाले असून त्यातील ४० जणांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. शुक्रवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास गुड फ्रायडे निमित्तचा कार्यक्रम सुरू असताना मधमाशांनी हा हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उबाठाशिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. तसेच पोलीस निरीक्षक मारुती जगतापही दाखल झाले होते. डॉ. पंकज पाटील, यांच्यासहित डॉ. अक्षय पाटील, डॉ. अजय शृंगारे, डॉ. सुजीता मंचिकलपुडी, डॉ. चंद्रतेज बी त्यांच्या सहित प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकारी तसेच परिचारिका नुपूर पवार, दिपाली ठाकूर, नयना मुसळे यांच्यासहित इतर कर्मचाऱ्यांनी मदत केली.