कणकवली : राज्य शासनाच्या “शाळा तेथे दाखले” या उपक्रमांतर्गत तहसीलदार कार्यालय कणकवली आणि कणकवली कॉलेज कणकवली यांचे संयुक्त विद्यमाने कणकवली तालुका अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यामध्ये उपयुक्त दाखले सरल पद्धतीने उपलब्ध व्हावेत यासाठी बुधवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी कणकवली कॉलेजच्या एच. पी. सी. एल. हॉलमध्ये ‘शाळा तेथे दाखले’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरांतर्गत विद्यार्थ्यांना उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, जन्म अधिवास दाखला ई. एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. तरी सर्व विद्यार्थी व पालकांनी वरील नमूद दाखले काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रासहित कार्यक्रम ठिकाणी उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा.
शैक्षणिक प्रवेशावेळी आवश्यक प्रमाणपत्राअभावी विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थी आणि पालकांना आवाहन करण्यात येते की, आपण या शिबिरामध्ये सहभागी होऊन आवश्यक दाखले काढून घ्यावेत असे आवाहन तहसीलदार श्री. दीक्षांत देशपांडे आणि कणकवली कॉलेज प्र.प्राचार्य युवराज महालिंगे यांनी केले आहे.