21.7 C
New York
Sunday, August 10, 2025

Buy now

प्रमोद जठार यांचा १८ रोजी मुंबईत वाढदिवस सोहळा!

कासार्डे येथेही १९ रोजी साजरा होणार!

कणकवली : माजी आमदार प्रमोद जठार यांचा ६० वा वाढदिवस मुंबई-भायखळा (पूर्व) राणीबाग येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात १८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वा. साजरा करण्यात येणार आहे. तसेच १९ रोजी माजी आमदार प्रमोद जठार मित्रमंडळातर्फे सायंकाळी ७वाजता कासार्डे येथील प्रमोद जठार यांच्या निवासस्थानी वाढदिवस सोहळा साजरा होणार आहे.

मुंबईत होणाऱ्या वाढदिवसाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, सांस्कृतिकमंत्री व भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, उद्योगमंत्री उदय सामंत, मत्स्योद्योग व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे, मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, शिवसेना नेते यशवंत जाधव, भाजप नेते मधु चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार आणि समीक्षक उदय निरगुडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने मीनल दांडेकर प्रस्तुत ‘अमेय दाते लाईव्ह’ हा सदाबहार गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे.

दि. १९ रोजी माजी आमदार प्रमोद जठार मित्रमंडळातर्फे कासार्डे येथील प्रमोद जठार यांच्या निवासस्थानी ६० वा वाढदिवस सोहळा साजरा होणार आहे. या निमित्ताने अस्सल मराठमोळा कलाविष्कार ‘उत्सव ऑ र्केस्ट्रा’ सादर केला जाणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमोद जठार मित्रमंडळाने केले आहे.

ब्युरो चीफ | मयुर ठाकूर 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!