पोलीस अंमलदार चंद्रकांत माने व पराग मोहिते यांनी घेतल्य नागरिकांच्या भेटी
पोलिसांच्या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांमधून व्यक्त होतेय समाधान
खारेपाटण – खारेपाटण पोलीस दुरक्षेत्र हद्दीतील गावांमध्ये जाऊन तेथील लोकांशी ग्रामसंवाद तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या समजून घेत योग्य ते मार्गदर्शन करण्याचा खारेपाटण पोलिसांनी उपक्रम राबविला आहे.
गेले काही दिवस या उपक्रमांतर्गत खारेपाटण पोलीस हे आपल्या दुरुक्षेत्र हद्दीतील गावांमध्ये जाऊन नागरिकांशी चर्चा, सुसंवाद करून, जेष्ठ नागरिक यांच्याशी सखोल संवाद करून योग्य ते मार्गदर्शन करीत आहेत.

१४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्या निमित्ताने कुरंगवणे – बेर्ले गावच्या संयुक्त ग्रामपंचायतमध्ये गावातील नागरिकांशी संवाद तसेच ज्येष्ठ नागरिक यांची खारेपाटण पोलीस अंमलदार चंद्रकांत माने यांनी भेट घेतली.

या कार्यक्रमांमध्ये लोकांना सायबर गुन्ह्यांबाबत माहिती, समाजातील जेष्ठ नागरिक घटकांसाठी असलेले भारतीय कायद्यानुसार त्याचे असलेले हक्क आणि अधिकार याविषयीं त्यांना सखोल माहिती पोलीस दलच्यावतीने देण्यात आली. तसेच नवीन कायद्याची जनजागृती, डायल ११२ कॉल बाबत माहिती देऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यात आल्या.
यावेळी गावचे सरपंच पप्पू ब्रह्मदंडे, उपसरपंच बबलू पवार, ग्रामसेवक, शाळेचे मुख्याध्यापक, गावचे नागरिक उपस्थित होते.
आत्तापर्यंत खारेपाटण पोलीस दूरक्षेत्र हद्दीतील खारेपाटण, खारेपाटण गुरव वाडी, खारेपाटण बसस्टॅण्ड, कोष्टीआळी, नडगिवे, चिंचवली, शिडवणे, साळीस्ते, कुरंगवणे व बेर्ले या गावांमध्ये जाऊन जनजागृती, ग्रामसंवाद, जेष्ठाच्या भेटी घेण्यात आल्या व मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी खारेपाटण दूरक्षेत्र चे पोलीस अंमलदार चंद्रकांत माने, पोलीस कॉनस्टेबल पराग मोहिते यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ज्या ज्या गावात ग्रामसंवाद व जेष्ठ नागरिक भेटी घेण्यात आल्या त्यावेळी त्या गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व सर्व नागरिक उपस्थित होते.
पोलिसांच्या या ग्रामसंवाद आणि जेष्ठ नागरिक भेटी व मार्गदर्शन या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होतं आहे.







