18.8 C
New York
Saturday, April 19, 2025

Buy now

राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचे आयोजन

कणकवली : राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरची शर्यत २० एप्रिल रोजी मालवण तालुक्यातील मालोंड माळ येथे होणार आहे. राकेश परब मित्रमंडळाच्यावतीने राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचे हे प्रथम वर्ष असून खुला आणि गावठी गटात ही बैलगाडा स्पर्धा संपन्न होणार आहे. खुल्या गटासाठी पहिला क्रमांक रू. २५००० व चषक, दुसरा क्रमांक रू. २०००० व चषक, तिसरा क्रमांक रू. १५००० व चषक, चौथा क्रमांक रू. १०००० व चषक, पाचवा क्रमांक रू. ७००० व चषक, सहावा क्रमांक रू. ५००० व चषक, सातवा क्रमांक रू. ३००० व. चषक. तर गावठी गटात -पहिला क्रमांक रू. ७००० व चषक, दुसरा क्रमांक रू. ५००० व चषक, तिसरा क्रमांक रू. ३००० व चषक, चौथा क्रमांक रु. २००० व चषक. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९४०४३९६२०० दया देसाई, ७०२०६६४७३४ संतोष मुणगेकर, ७५१७६६५२५० निखिल परब यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!